ACE Infotech Pvt Ltd
Wednesday, 14 November 2012
Thursday, 20 September 2012
Saturday, 11 February 2012
Wednesday, 16 November 2011
तुझी माझी पहिली भेट
तुझी माझी पहिली भेट
तुझी माझी पहिली भेट , ठरलेली नव्हती ,
गाडी तुझी माझी रुळावरच नव्हती .
काय नेम नव्हता , कुठे भेटणार .
काय कळत नव्हतं तुला कसं सांगणार .
दुपार झाली . उन वाढलं.
तुझ्या माझ्यातलं अंतर बरच वाढलं .
कधी दुपार टळेल , आपली भेट होईल .
काय व्हायचं ते होईल थेट होईल ,
संध्याकाळ होताच , तू पाणी भरण्यास निघाली .
आमची स्वारी मग पाण्याकडेच निघाली .
कधी सांगेन मनातलं असं वाटत होतं.
जवळ जाता जाता नाही म्हणत होतं .
तू काय म्हणशील अंदाज घेत होतं .
आमचं घोडं पाण्यालाच घाबरत होतं .
जवळपास कुणी नाही . हीच वेळ होती .
तू निघणार तुझी घागर भरली होती .
तू निघालीस . मी वेडा झालो .
स्वतालाच काय तरी बोलू लागलो .
तुला जाणवत होतं माझं वागणं .
असं तुझ्याकडं वेड्यासारखं बघणं.
तू वळलीस अचानक , म्हणालीस .
काय बोलायचं का ?
मी दचकलो ,
मनाला विचारलं उत्तर देऊ का ?
मन म्हणालं बोलून टाक ,
राज मनातले खोलून टाक ,
हिम्मत केली . बोलून टाकले .
परत येणार काय ? ...पाण्याला ...
ती हसली .. म्हणाली ..
माझं पाणी भरून कधीच झालाय ..
मी आलेय तुला भेटायला ..
मी अवाक! शब्दच सुचेना .
जे मी बोलायचं हिच बोलली .
अन आमची तर बोबडीच वळली .
जमवून हिम्मत परत एकदा ,
प्रश्न तिला केला ...माझं तुझ्यावर प्रेम आहे ..
ती हसली ..अन म्हणाली .
आता मी रोजच पाणी भरायला येणार आहे ........कळलं का?
तुझी माझी पहिली भेट , ठरलेली नव्हती ,
गाडी तुझी माझी रुळावरच नव्हती .
काय नेम नव्हता , कुठे भेटणार .
काय कळत नव्हतं तुला कसं सांगणार .
दुपार झाली . उन वाढलं.
तुझ्या माझ्यातलं अंतर बरच वाढलं .
कधी दुपार टळेल , आपली भेट होईल .
काय व्हायचं ते होईल थेट होईल ,
संध्याकाळ होताच , तू पाणी भरण्यास निघाली .
आमची स्वारी मग पाण्याकडेच निघाली .
कधी सांगेन मनातलं असं वाटत होतं.
जवळ जाता जाता नाही म्हणत होतं .
तू काय म्हणशील अंदाज घेत होतं .
आमचं घोडं पाण्यालाच घाबरत होतं .
जवळपास कुणी नाही . हीच वेळ होती .
तू निघणार तुझी घागर भरली होती .
तू निघालीस . मी वेडा झालो .
स्वतालाच काय तरी बोलू लागलो .
तुला जाणवत होतं माझं वागणं .
असं तुझ्याकडं वेड्यासारखं बघणं.
तू वळलीस अचानक , म्हणालीस .
काय बोलायचं का ?
मी दचकलो ,
मनाला विचारलं उत्तर देऊ का ?
मन म्हणालं बोलून टाक ,
राज मनातले खोलून टाक ,
हिम्मत केली . बोलून टाकले .
परत येणार काय ? ...पाण्याला ...
ती हसली .. म्हणाली ..
माझं पाणी भरून कधीच झालाय ..
मी आलेय तुला भेटायला ..
मी अवाक! शब्दच सुचेना .
जे मी बोलायचं हिच बोलली .
अन आमची तर बोबडीच वळली .
जमवून हिम्मत परत एकदा ,
प्रश्न तिला केला ...माझं तुझ्यावर प्रेम आहे ..
ती हसली ..अन म्हणाली .
आता मी रोजच पाणी भरायला येणार आहे ........कळलं का?
Monday, 31 October 2011
JEEVAN
मला मागचा रस्ता
स्वच्छ दिसतो आहे
जीवना -
कसा भेटलास समंजसपणे
की माशावरून पाणी
अलगद मागे जावं...
असं दिलंस सहजपणे
जसं पालवत्या पानानं
हिरवंच असावं...
शिरले अशी सहज तुझ्यात
जसं पावसाळी ढगानं
दरीच्या कुशीत शिरावं...
छातीच्या घुमटात
बांधल्याच नाहीस कधी
आशाळभूत राहुटया...
नि नजरेच्या टप्प्यात
कधी ओवल्याच नाहीस
निरर्थक भरार्या...
उचललेस माझे बाहू
तेही शुभंकर मुद्रेत...
अडवलेस पाय
ते देखील
धावत्या रस्त्यावर नव्हे
तर दरीच्या कडयाशी
जसे घरंगळते
मोती थोपवावेत...
कोसळले तीही जलप्रपाताप्रमाणे
की ज्याचा आवेग
हेही भूषण ठरावं...
विझले तीही मनस्वी वणव्याप्रमाणे
की ज्याचं श्रेय
कुणालाही घेता न यावं...
आणि वाहत राहिले
प्राणातल्या ऊर्ध्वगामी प्रेरणेसारखी
की नजरेत आभाळच साठत जावं...
म्हणून म्हणते जीवना -
जेव्हा मस्तकावर पसरला आहे
तुझ्या करुणेचा घनव्याकुळ संधिप्रकाश
मला पुढचा रस्ता
स्वच्छ दिसतो आहे...
Kid's club Public English School, Shiradhon-9922031231
Subscribe to:
Posts (Atom)




